• March 4, 2023
  • No Comment

वाहन चोरी ०८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ८ मोटार सायकली जप्त करुण आटक

वाहन चोरी ०८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ८ मोटार सायकली जप्त करुण आटक

सिंहगडरोड पोलीस स्टेशनच्या हाद्दीत वाहन चोरी च्या अनुशंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर यांना याच्या खास
बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम वडगाव ब्रिजचे खाली आलो असता धायरी फाटयाजवळ, एक इसम केसरी
रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबला असुन त्याने अंगात मरुन रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे अशी
खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांना कळविली.
त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर
बातमीच्या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खाञी केली असता बातमीत नमुद वर्णनाचा एक इसम धायरी
फाटयाजवळ, केसरी रंगाची यामाहा गाडी घेवुन थांबला दिसला आमची बातमीप्रमाणे खात्री होताच त्यास आमची येण्याची
चाहुल लागु न देता त्यास आहे त्या परिस्थितीत ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांने त्याचे नाव व
पत्ता रोहन महेंद्र देवरकर वय १९ वर्षे रा.मुळ रा. कुभार निवास आकरा फाटा वडगाव निंबाळकर ता. बारामती जि पुणे
सध्या रा. मानकर बिल्डींग प्लॅट नं ३०१ पोकळे नगर, सरडे बाग उत्तमनगर पुणे असे सांगितले, त्यानंतर त्याचेकडे ताब्यात
असलेल्या यमाहा मोटार सायकल गाडीचे कागदपत्र व लायसन्स बाबत विचारणा केली असता तो काही न बोलता कावरा-
बाव-या नजरेने इकडे तिकडे पाहुन उडवा-उडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्याचा आम्हांस संशय आल्याने त्याचेकडे त्याचे
ताब्यातील यमाहा मोटार सायकल बाबत अधिक तपास करता त्याने सदरची मोटार सायकल ही हॅप्पी कॉलनी दागंट आळी
वडगाव पुणे येथुन चोरल्याचे सांगितले असता त्यास अटक करुन अधिक चौकशी करता त्याचेकडुन खालील गुन्ह्यामधील
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१) सिंहगड रोड पो स्टे गुन्हा रजि नं. ११४/२०२३ भा द वि कलम ३७९
२) सिंहगड रोड पो स्टे गुन्हा रजि. नं. ११५/२०२३ भा द वि कलम ३७९
३) सिंहगड रोड पो स्टे गुन्हा रजि. नं. ०३/२०२३ भा द वि कलम ३७९
४) वारजे माळवाडी पो स्टे गुन्हा रजि. नं. ४२ / २०२३ भादवि कलम ३७९
५) उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि. नं. ११ / २०२३ भादवि कलम ३७९
६)उत्तमनगर पो स्टे गुन्हा रजि. न. २४/२०२३ भादवि कलम ३७९
७) लोणी काळभोर पो स्टे गुन्हा रजि. नं.६५२ / २०२२ भादवि कलम ३७९
८)वडगाव (कोल्हापुर) पो स्टे गुन्हा रजि. नं.९१ / २०२३ भादवि कलम ३७९
असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ८ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन पुढील तपास
सपोनि सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे मा. पोलीस उप-आयुक्त
परीमंडळ -३, श्री.सुहेल शर्मा मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. राजेंद्र गलांडे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री
शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस
उप निरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, सुनिल चिखले, संजय शिंदे, शिवाजी क्षिरसागर, राहुल
ओलेकर, अमित बोडरे, राजाभाऊ वेगरे, अमोल पाटील, सागर शेडगे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, अविनाश कोंडे, विकास
बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *