• March 31, 2023
  • No Comment

हडपसर भागात मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत कोयत्याने वार

हडपसर भागात मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत कोयत्याने वार

पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात कोयता गॅंगद्वारे गुन्ह्याच्या घटना वारंवार घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही या घटनांमध्ये वाढच होत आहे. अशीच आणखी एका गॅंगवारची भयंकर घटना शहरात समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागात मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत कोयत्याने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, 2020 साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर शुभम भोंडे हा तरुण सध्या बाहेर आला आहे. त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. पुणे शहरातील हडपसर भागात गँगवॉरचा प्रकार घडला. मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत सराईत गुन्हेगारांकडून कोयत्याने वार करण्यात आले.

रिक्षाला दुचाकी आडवी लावून रिक्षातून बाहेर पडणाऱ्या शुभम भोंडे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार” असे म्हणून त्याच्यावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले.
या प्रकारामुळे पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *