- April 23, 2023
- No Comment
धक्कादायक! प्रेयसीच्या लहान मुलाचा उकळत्या पाण्यात बुडवून खून
चाकण: अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलगा गंभीरपणे भाजला. त्यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर धक्कादायक प्रकार 6 एप्रिल रोजी सकाळी खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे घडला.
विक्रम शरद कोळेकर (रा. कोयाळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने शनिवारी (दि. 22) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे अनैतिक संबंध होते. त्यातून आरोपीने फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय एकत्र धरून बाथरूम मधील उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पाय गंभीरपणे भाजली गेली. भाजलेल्या ठिकाणची कातडी जळून गेल्याने उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मानलेल्या बहिणीला धमकी दिली. मानलेल्या बहिणीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.