• April 23, 2023
  • No Comment

प्रियकराच्या धमकीत तरुणीची आत्महत्या

प्रियकराच्या धमकीत तरुणीची आत्महत्या

 

पुणे: विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एकविस वर्षीय तरुणी कोंढवा भागात राहायला होती. तिचे आरोपी अक्षयशी प्रेमसंबंध होते. अक्षय तिला विवाहासाठी धमकावत होता. माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती.आरोपी अक्षयने मोबाइलवर विषारी औषध पिऊन आत्महत्या करत असल्याची ध्वनिचित्रफीत पाठविली होती. त्यानंतर तरुणी घाबरली.

अक्षयने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी धमकी तरुणीला दिली होती. सासवड रस्त्यावरील वडकी भागात एका लाॅजमध्ये तरुणीने खोली घेतली. तिने लाॅजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लाॅज व्यवस्थापकाने लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती दिली.

दरम्यान, तरुणीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. अक्षयने मुलीला धमकी दिली होती. त्याच्या धमकीमुळे तिने आत्महत्या केली, असे तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस उपनिरीक्षक तरटे पुढील तपास करत आहेत.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *