• April 23, 2023
  • No Comment

एसआरए प्रकल्पास आडकाठी आणल्याबद्दल तिघांना बेदम मारहाण

एसआरए प्रकल्पास आडकाठी आणल्याबद्दल तिघांना बेदम मारहाण

     

    पिंपरी: एसआरएच्या कामाला अडथळा करतो सही देत नाही, असे म्हणत तिघांना 20 ते 22 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी मधील यशवंतनगर आणि वायसीएम हॉस्पिटल येथे घडली.

    शंकर संभा चौधरी, गौरव शंकर चौधरी, प्रदीप बंकट शिंदे, स्वप्निल महावीर गायकवाड, परमेश्वर चौधरी, अविनाश चौधरी, गौरव चौधरी, स्वप्निल गायकवाड, प्रदीप शिंदे, पाच महिला आणि इतर सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाचा साहिल आणि पती नवनाथ यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा भाचा साहिल याच्या डोक्यात कोयत्याने मारल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले असता तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. फिर्यादी यांच्या पतीला ‘तू आमच्या एसआरएच्या कामाला अडथळा करतो, सही देत नाही का’ असे म्हणून शिवीगाळ करत कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *