• April 23, 2023
  • No Comment

भर दिवसा घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज लंपास

भर दिवसा घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज लंपास

     

    दिघी: भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दोन लाख 53 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत चौधरी पार्क दिघी येथे घडली.

    अविराज शांताराम खाडे (वय 39, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 65 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 53 हजार 265 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

    पुढील तपास दिघी पोलस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *