• April 24, 2023
  • No Comment

अश्लील रॅप सॉंग प्रकरणी पुणे विद्यापीठात तोडफोड

अश्लील रॅप सॉंग प्रकरणी पुणे विद्यापीठात तोडफोड

    पुणे: काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक अश्लील भाषेतील रॅप सॉंग शूट करण्यात आलं होतं. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला असून पुणे विद्यापीठात तोडफोड केली आहे.

    अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार घोषणाबाजी केली आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली बैठकही उधळून लावली. यावेळी विद्यापीठातील काही वस्तूंची तोडफोडही करण्यात आली आहे.

    काही दिवसांपूर्वी शुभम जाधव नावाच्या एका तरुणाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप सॉंग शूट केलं होतं. या रॅप सॉंगमध्ये अश्लील भाषेचा भडीमार होता. विद्यापीठाच्या आवारातील आणि हॉलमधील काही दृश्य या रॅप सॉंगमध्ये होती. हे रॅप सॉंग प्रदर्शित झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला.

    विद्यापीठात अशा प्रकारचं गाणं शूट करणाऱ्या विरोधात कारवाई केली जावी अशीही मागणी जोर धरत होती. त्यानंतर रॅपर शुभम जाधव यांच्या विरोधात चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यापीठाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच विद्यापीठातील हॉलमध्ये सुरू असणारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठकही या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. इतकंच नाही तर काही काचांची आणि वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *