• April 24, 2023
  • No Comment

विवाहितेने लग्नास नकार दिल्याने तिच्या मुलाला ठार मारणारा आरोपी गजाआड, गुन्हे शाखा युनिट तीन ची कामगिरी

विवाहितेने लग्नास नकार दिल्याने तिच्या मुलाला ठार मारणारा आरोपी गजाआड, गुन्हे शाखा युनिट तीन ची कामगिरी

चाकण: विवाहितेने लग्नाला नकार दिल्याने तिच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात बुडवून ठार मारणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने बेड्या ठोकल्या.

गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रथम मुंबई आणि तिथून इतर ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला बहुळ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

शरद कोळेकर (वय 23, रा. कोयाळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद याने एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. त्याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याला एक मुलगा देखील आहे. फिर्यादी महिला ऑर्केस्ट्रामध्ये काम करते. त्यातूनच आरोपीची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली. महिलेला सव्वा वर्षाचा मुलगा आहे. ती आणि तिची मानलेली बहीण एकत्र राहत होत्या.

मागील काही दिवसांपासून आरोपी देखील फिर्यादी महिलेच्या घरी राहत होता. दरम्यान त्याने फिर्यादी महिलेकडे लग्नाची मागणी घातली. मात्र आरोपीसोबत लग्न करण्यास फिर्यादीने नकार दिला. त्या कारणावरून आरोपीने 6 एप्रिल रोजी फिर्यादी यांच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय एकत्र धरून बाथरूम (Chakan) मधील उकळत्या पाण्यात बुडवले. त्यामध्ये मुलाची पाठ, डोके, चेहरा, पोट, पाय गंभीरपणे भाजली गेली. भाजलेल्या ठिकाणची कातडी जळून गेल्याने उपचारादरम्यान मुलाचा 18 एप्रिल रोजी मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार आरोपीने फिर्यादी यांच्या मानलेल्या बहिणीसमोर केला. मानलेली बहीण विरोध करत असताना तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा आरोपीने प्रयत्न केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीन कडून केला जात होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट तीनने दोन पथके तयार केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे खेड तालुक्यातील बहुळ परिसरात सापळा लावून गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. आरोपी गुन्हा करून मुंबईला आणि तिथून बाहेर अज्ञात ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी गुन्हे शाखेने आरोपीला बेड्या ठोकल्या

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिम, ऋषिकेश भोसुरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, सुधीर दांगट, समीर काळे, निखल फापाळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनमंते, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *