• April 24, 2023
  • No Comment

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

    पुणे: व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    यासंदर्भात एका 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफीक शेख (वय45) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जुगनू शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी आणि शेख यांच्यात 2020 मध्ये भिशीचा व्यवसाय होता. तो बंद झाल्यामुळे आरोपीने फिर्यादी महिलेला दुसरा व्यवसाय सुरू करू, असे सांगितले. त्यासाठी आरोपीने 2020-21 या कालावधीत फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वेळोवेळी 4 कोटी रुपये घेतले. परंतु त्यांना काहीही पैसे न देता आर्थिक फसवणूक केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *