- April 24, 2023
- No Comment
कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून
कामशेत: कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (दि. 23) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
संतोष महादेव घाटे (रा. फिरस्ती. मूळ रा. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विजय सतू भोंडवे (वय 22, रा. भाजगाव, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कामशेत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.