• April 24, 2023
  • No Comment

इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

    म्हाळुंगे: इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 23 ) दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाषवाडी येथे करण्यात आली.

    पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण गिरण्या गुडदावत (वय 23), तीरसागर चेतन मन्नावत (वय 22), गणेशजीवन मन्नावत (सर्व रा. सुभाषवाडी, निघोजे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषवाडी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. आरोपींनी 20 हजार लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन तयार केले होते. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *