- April 24, 2023
- No Comment
खडकीत चाकू गळ्यात खूपसून महिलेचा निर्घृण खून
खडकी: खडकी बाजार परिसरात एका 46 वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. काही वेळापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
खडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अनैतिक संबंधातून हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत महिला ही 46 वर्ष वयाची आहे. खडकी बाजार परिसरातच ती काम करते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले आहे. दरम्यान आज सकाळच्या सुमारास ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसून आले. माहिती मिळताच खडकी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.