• April 25, 2023
  • No Comment

कॉसमॉस बॅंक सायबर हल्लाप्रकरणी आरोपींना कैद व आर्थिक दंडाची शिक्षा

कॉसमॉस बॅंक सायबर हल्लाप्रकरणी आरोपींना कैद व आर्थिक दंडाची शिक्षा

सिंहगड: कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लांबविणार्‍या 11 आरोपींना शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

आरोपींना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली होती.

त्यांपैकी एका आरोपीचा मृत्यू झाला होता. फहिम मेहफूज शेख (रा. भिवंडी, ठाणे), फहिम अझीम खान (रा. आझादनगर, सिल्लोड, ओैरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लोड, ओैरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार, जि. पालघर), मोहंमद सईद इक्‍बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. हमालवाडा, दर्गा रस्ता, नांदेड), युस्टेस अगस्टीन वाझ (रा. जोगेश्‍वरी, मुंबई), अब्दुला अफसरअली शेख (रा. मिरा रोड, जि. ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई) यांना दोषी ठरवून चार वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.

त्यांना 200 रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवसांची कैद, तसेच अन्य कलमांन्वये तीन वर्षे साधी कैद, 100 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, 100 रुपये दंड, दंड न भरल्यास तीन दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर, सलमान मोहंमद नईम बेग (रा. तनवरनगर, मुंब्रा, जि. ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) या दोघांना न्यायालयाने तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये तीन वर्षे साधी कैद, तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी कोल्हापूर, अजमेर, इंदौर, मुंबई परिसरातून आरोपींना अटक केली होती. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

आरोपींनी गणेशखिंड रस्त्यावरील सर्व्हर यंत्रणेवर सायबर हल्ला करुन एकूण 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लांबविली होती.त्यातील थोडी रक्कम त्यांनी परदेशातील बॅंक खात्यात वळविली होती तर बाकीची रक्कम बनावट डेबिट कार्डचा वापर करुन काढली होती.सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून आरोपींनी परदेशातील ज्या बॅंकेत रक्कम वळविली होती. त्या बॅंकेशी तातडीने संपर्क साधून खाती गोठविली होती. त्यासाठी पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांनी सहकार्य केले होते.

अतिरिक्त पोलीस आयुक्त देशपांडे, सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग, संभाजी कदम, सहायक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक सागर पानमंद, हवालदार अस्लम अत्तार, संतोष जाधव आदींनी या प्रकरणाचा तपास केला.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *