• April 25, 2023
  • No Comment

हवेत गोळीबार करून वाईन शॉप लुटण्याचा प्रयत्न

हवेत गोळीबार करून वाईन शॉप लुटण्याचा प्रयत्न

    सिंहगड: पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे वाईन शॉप मालकाच्या हातातून पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार दोघांनी केलाय. मात्र नागरिक आणि दुकानातील कामगार जमा झाल्याने लुटारूंनी हवेत गोळीबार करून पळ काढला. नऱ्हे परिसरातील हिरो वाईन्स जवळ ही घटना घडली.

    याप्रकरणी तुकाराम सोपान इंगळे (वय 57) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार दोन अनोळखी आरोपीविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तुकाराम इंगळे यांच्या मालकीचे हिरो वाईन शॉप आहे. रविवारी रात्री वाईन शॉप बंद करून घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तुकाराम इंगळे यांच्या दिशेने दोघेजण आले. त्यांनी तुकाराम इंगळे यांच्याजवळ येऊन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. इंगळे यांच्या जवळ असलेली पैशाची बॅग हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र इंगळे यांनी विरोध करत बॅग घट्ट धरून ठेवली त्यामुळे चोरट्यांना बॅग पळवता आली नाही.

    त्यानंतर दुकानातील कामगारांनी नागरिक घटनास्थळी जमा झाल्याचे पाहून तरुणांनी पिस्तूल हवेच्या दिशेने रोखून गोळीबार केला आणि त्यानंतर ते महाराष्ट्र बँकेच्या दिशेने पसार झाले. सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *