• April 26, 2023
  • No Comment

आईवरुन शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा खून

आईवरुन शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा खून

    पुणे : आईवरुन शिवीगाळ केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा खून करुन पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळी कोंढव्यातील पिसोळी भागात ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

    हकिमुद्दीन ताहेरभाई बारोट (वय ६६, रा. पिसोळी, कोंढवा) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी महेश महादेव ओव्हाळ (वय ३२, रा. सिद्धार्थनगर, पिसोळी) याला अटक करण्यात आली. मरियम हकिमुद्दीन बारोट (वय ६५) यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर हकिमुद्दीन बारोट यांच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला होता. पोलिसांना खुनामागचे कारणही समजू शकले नव्हते पोलिसांच्या पथकाने तातडीने तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी महेश ओव्हाळला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हकिमुद्दीन यांनी आईवरुन शिवीगाळ केल्याने त्यांच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची कबुली त्याने दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *