• April 26, 2023
  • No Comment

WhatsApp नं दिली आनंदाची बातमी! आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट, पहा सविस्तर!

WhatsApp नं दिली आनंदाची बातमी! आता चार मोबाईलमध्ये चालणार एक अकाउंट, पहा सविस्तर!

     

    वॉट्सअप जगभरात प्रसिद्ध असणारे मेसेजिंग अॅप. आता आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्स अॅपने मोठी अपडेट दिली आहे. आता तुमच एकच अकाउंट चार मोबाईलवरती चालणार आहे. WhatsApp ने मल्टीपल डिव्हाईस सपोर्ट लाँच केलं आङेत.

    यामुळे आता वापरकर्त्यांना एकच अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार आहे.

    याअगोदर एकच अकाउंट एक फोनमध्ये आणि वेब व्हॉट्सअपद्वारे पीसीवरती वापरता येत होते, आता चार फोनमध्ये एकच अकाउंट वापरता येणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी हे फिचर लाँच करण्याची घोषणा केली आहे.

    “आजपासून तुम्ही एकच WhatsApp अकाउंट चार फोनमध्ये वापरु शकता,” असं काल मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर काही आठवड्यांत सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल. व्हॉट्सअॅपच्या या फीचरची अनेक दिवसांपासून यूजर्स वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअॅप बीटा यूजर्ससाठी सुरू करण्यात आले होते.

    नवीन अपडेटच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचे मेसेज आणि चॅट सर्व डिव्हाइसेसवर सिंक करण्यास सक्षम असतील. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात प्रवेश करण्यासाठी नेहमीच डिव्हाइस सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. WhatsApp चे हे फीचर एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह आले आहे.

    म्हणजेच अनेक डिव्हाईमध्ये तुम्ही WhatsApp चे अकाउंट वापरु शकता. केपनी या फिचरला २०२१ पासूनच WhatsApp Beta वर टेस्ट करत आहे. काही दिवसापूर्वीच कंपनीने या फिचरला सर्व बीट वापरकर्त्यांसाठी सुरू केलं होतं.

    हे फीचर वापरण्यासाठी, तुम्ही अगोदर दोन फोनमध्ये WhatsApp सुरू करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप उघडल्यावर, तुम्हाला वर दाखवलेल्या हॅम्बर्गर मेनूवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Link to Existing Account चा पर्याय मिळेल.

    त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर QR Code येईल. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप उघडावे लागेल आणि लिंक डिव्हाइसेसच्या पर्यायावर जावे लागेल.

    आता तुम्हाला पहिल्या फोनवरून दुसऱ्या फोनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करावा लागेल. अशाप्रकारे, तुम्ही दोन्ही स्मार्टफोनवर समान WhatsApp खाते वापरू शकता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *