• April 26, 2023
  • No Comment

पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

पुणे: संयुक्त पूर्व परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय

     

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा होणार आहे. याच परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

    त्यानंतर आता एमपीएससीने या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

    रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.

    तसेच, अशा प्रकरणी आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. परीक्षेनंतर सर्व उपकेंद्रावरील सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी करण्यात येईल. सदर तपासणीमध्ये कोणताही उमेदवार आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचे आढळून आल्यास अशा उमेदवारांवर परीक्षेतील गैरप्रकाराचा प्रयत्न समजून कारवाई करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *