- April 27, 2023
- No Comment
वाहतूक पोलिसानेच केला दारु पिऊन धिंगाणा
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत कायम आहे. मात्र यातच आता वाहतूक पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे पोलीस विभागावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने भर रस्त्यात तलवार उगारgन दहशत माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली आहे. पोलिसानेच असं कृत्य केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असं या पोलिसाचं नाव आहे.
या तलवार उगारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत. त्यानुसार विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. जाधव हे पुण्यातील मुंढव वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. पुण्यातील धानोरी परिसरात त्यांनी जाणता राजा चौकात तलवार घेऊन दहशत पसरवली. यासंदर्भातील माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी मिळाली. त्यानंतर लगेच पोलिसांनी धानोरीतील जाणता राजा चौकात धाव घेतली आणि जाधव यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हे मुंढवा येथील वाहतूक शाखेत कार्यरत असल्याचं समोर आलं त्यानंतर त्यांनी दारु पिऊन धिंगाणा केल्याचंही समोर आलं. त्यानंतर त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली.