• April 29, 2023
  • No Comment

विवाहित तरुण आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित तरुण आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

    पुणे : पत्नीसोबत पटत नसल्याची बतावणी करुन एका तरुणीला जाळ्यात ओढून तिची विवाहित तरुणाने फसवणूक केली. विवाहित तरुण आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी चंदन तेजवाणी आणि त्याची पत्नी लता तेजवाणी (दोघे रा. निगडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरभी सचिन जगताप असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपी चंदन विवाहित आहे.

    तीन वर्षांपूर्वी त्याची तरुणीशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझे पत्नीशी पटत नाही. मी तुझ्याबरोबर विवाह करतो, असे आमिष चंदनने तरुणीला दाखविले. चंदनच्या प्रेमसंबंधाची माहिती लताला समजली. त्यानंतर चंदन आणि त्याची पत्नी लताने सुरभीशी वाद घालून तिला मारहाण केली. फसवणूक तसेच मारहाण करण्यात आल्याने सुरभीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *