- April 29, 2023
- No Comment
खराडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक ;त्याच्याकडून गांजा, मोबाइल, दुचाकी असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: खराडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून गांजा, मोबाइल, दुचाकी असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महम्मद सुप्तेन मुश्ताक शेख (वय २६, रा. कांतीकुंज बिल्डींग, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख खराडी भागात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी रवींद्र रोकडे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शेखला पकडले. त्याच्याकडून गांजा, मोबाइल संच, दुचाकी असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, शुभांगी नरके, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, साहिल सय्यद, संतोष देशपांडे आदींनी ही कारवाई केली.