- May 3, 2023
- No Comment
माण ग्रामपंचायत सरपंचाच्या पतीवर जीवघेणा हल्ला

माण ग्रामपंचायतीच्या दगडफेक सरपंचपदाचा राजीनामा देत नाही
म्हणून माणच्या महिला सरपंच अर्चना आढाव यांच्या पतीच्या फॉर्म्युनर गाडीवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने करीत खुनी हल्ला केला. या हल्ल्यात सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९, सध्या रा. तनिष्क सोसायटी गणेशनगर डांगे चौक हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या हल्ल्यात त्यांच्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान करत
टोळक्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना
रविवारी (दि. ३०) पहाटे सव्वा एकच्या सुमारास माणगावातील
माणदेवी मंदिरासमोर मुख्य चौकात घडली. पोलिसांनी दिलेल्यामा हितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच र्चा करण्यासाठी आढाव यांना माण देवी मंदिरसमोर आरोपींनी बोलावले. आढाव तिथे पोहचताच तुझी पत्नी सरपंच पदाचा राजीनामाका देत नाही म्हणून १५ ते १६ जणांच्या टोळक्याने हातामध्ये सिमेंटचे ब्लॉक, दगड घेऊन मोटारीवर दगडफेक सुरू केली.आढाव यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले. दरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन बोडके नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी माण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवी बोडके,प्रदीप पारखी, राज बहिरट,सोन्या बोडके, सचिन बोडके यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील रवी बोडकेवर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याने पोलीसत्याचाही तपास करत आहेत. हे सर्व आरोपी फरार झाले असूनघटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती लागत नसल्यानेमाण ग्रामस्थांकडून पोलिसांच्याभूमिका व कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मावळ व मुळशी परिसरात होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचेवातावरण आहे




