- May 7, 2023
- No Comment
पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक प्रदीप कुरुलकरांची ‘रॉ‘कडून चौकशी
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सप्टेंबर २०२२ पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेच्या रिसर्च ॲन्ड ॲनालिसिस विंग (रॉ)च्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना नेमकी काय माहिती पुरविली, ते हॅनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, याची माहिती अधिकारी घेत आहेत. गुप्तचर यंत्रणेला याची कुणकुण जानेवारीत लागली. हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांचा लॅपटॉप व मोबाइल जप्त केला. डीआरडीओच्या समितीकडे याची चौकशी सोपविली होती.
चौकशीत ते दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाइल एटीएसएच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. त्याची तपासणी केल्यावर अनेक बाबी समोर येत असल्याचे आढळून आले आहे.
कुरुलकर यांनी वर्षभरात अनेकदा परदेशात भेटी दिल्या. या काळात ते पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय आहे.
भेटीत कोणती कार्यालयीन गोपनीय माहिती दिली. त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला.
ही गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी दिली की, अन्य काही कारणे होती, याचा तपास रॉचे अधिकारी करत आहेत.