• May 8, 2023
  • No Comment

येरवडा पोलीस कडून नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळया जप्त

येरवडा पोलीस कडून नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळया जप्त

    पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना गुप्त
    बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा राजीव गांधी परिसरात मानवी मनावर परिणाम करणा-या नशाकारक, गुंगीकारक औषधी गोळयांची अवैध्यरित्या विक्री करीत आहे. सदरची बातमी पोलीस उप निरीक्षक अंकुश डोंबाळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली राजीव गांधीनगर येरवडा येथे पो.उप निरी. अंकुश डोंबाळे, पोलीस अंमलदार अमजद शेख, अनिल शिंदे हे सापळा रचून थांबलेले असताना एक
    संशयीत काळे रंगाची पिशवीसह मिळून आल्याने त्याला जागीच पकडले असता त्याने आपले नाव असिफ अकबर शेख वय १९ रा गल्लीनं ७ राजीव गांधीनगर येरवडा पुणे असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडतीत एक काळे रंगाचे पिशवीमध्ये २२००/- रु. कि. च्या २२ स्ट्रीप्स नशाकारक,
    गुंगीकारक औषधी गोळया मिळून आल्या आहेत.
    आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा
    पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अशोक काटे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *