- May 8, 2023
- No Comment
एक वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस केले अटक
दि.१७/०३/२०२२ रोजी फिर्यादी यांना लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केले बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद आहे.दाखल गुन्हयाचा तपास करून यातील आरोपी अमीत संजय मोरे वय २६ वर्षे रा. गल्ली
नं.१३/१४ खंडाळे चौक साईबाबा मंदीरा जवळ तळजाई वसाहत पद्मावती पुणे २) रोहन राजु आरडे (गायसोन्या किंवा सोन्या गायकवाड ) वय २० वर्षे रा. गल्ली नं. १२ मेहबुब भाजीवालेचे गल्लीत तळजाई वसाहत पुणे व एक विधी संघर्ष बालक यांना अटक करून त्यांचे विरूध्द यापुर्वी मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे.दाखल गुन्हयामधील आरोपी नामे आदित्य पद्माकर डाकले ऊर्फ शेंडया वय २० वर्षे रा.९४३महात्मा गांधी सोसायटी तळजाई वसाहत पद्मावती पुणे हा गुन्हा घडल्यापासुन पळुन जावुन लपुन बसला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे श्री. सावळाराम साळगांवकर यांनी पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करणे बाबतचे आदेश व सुचना तपास पथकाचे अधिकारी व
अंमलदार यांना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे व तपास पथकाचे स्टाफने तपास सुरु केला. पाहीजे आरोपींचा बातमीचे आधारे शोध घेत असताना पोलीस
अंमलदार महेश मंडलीक व विशाल वाघ यांना बातमी मिळाली की, एक वर्षापासुन फरारी असलेला पाहिजे आरोपी १) आदित्य डाकले / शेंडया हा त्याचे राहते घरी आला आहे. लागलीच त्याचे घरी जावुन
पाहता तो घरात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १)आदित्य पद्माकर डाकले ऊर्फ शेंडया वय २० वर्षे रा. सदर असे असल्याचे सांगितले. सदरचा आरोपी हा
सहकारनगर पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो गुन्हा घडल्यापासुन पळुन जावुन सोलापुर,उस्मानाबाद या भागात लपुन छपुन राहत होता. त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मनोज शेडगे
यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली आहे.