- May 8, 2023
- No Comment
मुलाकडून दारुड्या वडिलांचा डोक्यात दगड घालून खून; मुळशीतील घटना
पौड : कुंभेरी ता मुळशी येथे एका मुलानेच आपल्या वडिलाला मारहाण करुन खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस पाटील वसंत लक्ष्मण दळवी यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीप्रमाणे संभाजी बुडण शिंदे (वय 58 वर्षे रा कुंभेरी ता मुळशी जि पुणे) यांना त्याचाच मुलगा आरोपी संजय संभाजी शिंदे याने मौजे कुंभेरी गावचे हद्दीत राहत्या घरात दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. यात वडील संभाजी शिंदे याचा मृत्यू झाला.
संभाजी हा दररोज दारू पिउन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याचा राग मनात धरून मुलानेच वडील संभाजी शिंदे यांना लाथाबुक्क्याने त्यांचे डोक्यावर, तोंडावर, हातापायावर, मारहाण केली. त्यानंतर मोठा दगड उचलुन डोक्यात घालुन त्यांचा खुन केला. पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून ता.7 रोजी आरोपी मुलगा संजय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हवेली विभागीय अधिकारी ढोले पाटील व प्रभारी अधिकारी मनोज कुमार यादव यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मृगदीप गायकवाड हे करीत आहेत