• May 8, 2023
  • No Comment

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार ०२ वर्षासाठी तडीपार

लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार ०२ वर्षासाठी तडीपार

लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनिल पोपट भोर, वय २५ वर्षे, रा. वाडेगाव नाहेरवस्ती वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे यांस पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेबोल्हाई, अष्टापुर फाटा तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माणकरुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोकानिर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदरसराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. किशोरलोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मारुतीपाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६
प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उप आयुक्त श्री शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त साो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त साो.श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो. श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव,
किरण पड्याळ, अमोल ढोणे,साई रोकडे, दिपक कोकरे, विजय आवाळे यांनी केली आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *