• May 9, 2023
  • No Comment

पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्याच्या   आवळल्या मुसक्या

    पुणे पोलिसांनी अनेक व्यावयिकांना गंडा घालणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. राज्यातील किराणा दुकानदारांना फसवणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे सांगली, नागपूर, पिंपरी चिंचवड यासारख्या अनेक शहरात किराणा दुकानदारांकडून माल घेऊन पळून जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत राज्यातील अनेक व्यावसायिकांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या आरोपीने कोविड काळात संपूर्ण घोटाळा केल्याची माहितीही समोर आली आहे.


    हितेश नानकराम आसवानी (३५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो नागपूरचा आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना याच्या विरुद्ध देखील गुन्हा आरोपी आसवानी आणि तन्ना यांनी राधा एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केला होता.

    त्या दोघांनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून तूप, गूळ, बदाम, सुपारी, रवा असा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी केला. त्यानंतर ते पैसे न देता पसार झाले होते. या दोघांच्या विरोधात राज्यातील विविध ६ पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *