• May 9, 2023
  • No Comment

पुणे शहरात कोट्यावधी रुपयांच्या नोटा जप्त;पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात ही कारवाई

पुणे शहरात कोट्यावधी रुपयांच्या नोटा जप्त;पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात ही कारवाई

    पुणे : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात कोट्यावधी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. या नोटांचा संबंध हवाल्याशी आहे का? कर्नाटक निवडणुकीसाठी या नोटा जात होत्या? हे प्रश्न निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला तब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसांच्या पथकाला ही रक्कम मिळाली. या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.

    पोलिसांना नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमध्ये सापडल्या. सोमवारी मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची ही रक्कम पुणे पोलिसांना मिळाली. या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीन मिळाले
    या प्रकरणात गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का? किंवा १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा पाठवल्या तर जात नव्हत्या, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. चौकशीतून काय मिळेल, त्यानंतर या प्रकारणाच्या तपासालाही गती येणार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *