• May 14, 2023
  • No Comment

अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीतवाढ झाली आहे. त्यातच खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यात सातत्याने वाढच होताना दिसत आहे. अशीच एक संतापजनक आणि धक्कादायक घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलीला मारण्याची आणि तिचं कॉलेज बंद करण्याची वारंवार धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी एका 21वर्षीय नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

    या प्रकरणी अल्पवयीन मुलीने मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिजीत दिलीप पापळ (वय 21, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी ही मार्केटयार्ड परिसरात राहते. ती एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी ती pmpml बसचा वापर करत होती. याच प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली होती. याच ओळखीचा आरोपीने गैरफायदा घेतला आणि तिला धमकी द्यायला सुरुवात केली. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे
    भूगाव येथील एका लॉजवर घेऊन जात अभिजीत पापळ याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर याविषयी कुठे वाच्यता केल्यास किंवा कोणाला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देखील दिली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी ही पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत होती.अखेर हिम्मत करून तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *