• May 15, 2023
  • No Comment

पत्नी आणि तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या त्रासामुळे पतीची गळफास घेऊन आत्महत्या

    पुणे: पत्नी आणि तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला.
    संतोषकुमार बाबासाहेब कोरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी रवीना संतोषकुमार कोरे (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) हिच्यासह रंजना दामोदर इरळे, दामोदर इरळे, संग्राम दामोदर इरळे, गणेश दिवेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत संतोषकुमारची आई यशोदा बाबासाहेब कोरे (वय ५५, रा. कोळी ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

    संतोषकुमार यांना मालमत्तेसाठी पत्नी रवीना, सासू रंजना, सासरे दामोदर त्रास देत होते. त्यांच्या त्रासामुळे मुलगा संतोषकुमारने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे यशोदा कोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

    आरोपींनी संतोषकुमार यांच्या बँक खात्यातून पैसे काढून अपहार केला, तसेच त्यांच्या नावावर असलेली सदनिका आणि जागा बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *