• May 15, 2023
  • No Comment

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा

    आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाला एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॅनियल कूपर, अलेक्झांडर हुडहेड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या बाबत एका व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक वडगाव शेरी भागात राहायला आहे. आरोपींनी व्यावसायिकाला इ-मेल पाठविला होता. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष इ-मेलद्वारे दाखविण्यात आले होते. आरोपींनी व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क साधून त्याला आभासी चलन गुंतवणूक योजनेची माहिती देऊन जाळ्यात ओढले.

    त्यानंतर व्यावसायिकाने वेळोवेळी एक कोटी १२ लाख ६० हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा केले. पैसे स्विकारल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील अधिक तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *