- May 17, 2023
- No Comment
विश्रांतवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई
पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नितेश सुनिल सदभैय्या, वय – २१ वर्षे, रा.स.नं.१०६,कतारवाडी, भैरवनाथ मंदिराशेजारी, येरवडा, पुणे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता,लोखंडी फायटर, लोखंडी रॉड या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक हत्याराने दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
मागील ०५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, यांनी नमूद इसमाचे विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्री दत्तात्रय भापकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पो.स्टे. पुणे शहर व श्रीमती सुरेखा वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.