- May 17, 2023
- No Comment
परिक्षार्थी म्हणून येवून मोबाईल चोरी करणारा उच्चशिक्षीत तरूणास चोरीच्या गुन्हयात केले शिताफीने अटक
परिक्षार्थीची हे स्पर्धा परिक्षा देण्याकरीता डिजीटल हब, रामटेकडी, पुणे येथे आले असता त्यांनी तसेच परिक्षार्थींनी त्यांचे मोबाईल, कागदपत्रे व वस्तू असलेल्या बॅगा आवारातील मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या. परिक्षा देवून परत बॅग घेण्यासाठी बॅग ठेवलेल्या ठिकाणी फिर्यादी हे परत आले असता तेथे एका परिक्षार्थीची बॅग मिळाली नाही, तसेच एका परिक्षार्थीचा त्याचे बॅगमध्ये ठेवलेला मोबाईल मिळून आला नाही. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हयातील गेलेले मोबाईल व अज्ञात चोरटयाचा शोध घेत असताना तपासपथक अधिकारी पोउपनि संतोष सोनवणे व अंमलदार अमोल गायकवाड तसेच विठठल चोरमले यांनी वरिष्ठ पोलीस
निरिक्षक भाऊसाहेब पटारे यांचे सुचनांप्रमाणे कार्यवाही करत परिसरामध्ये गस्त करून गुप्त बातमीदाराकडून बातमी प्राप्त करून सापळा रचुन आरोपीत यास अटक केले व त्यास त्याचे नाव पत्ता
विचारता त्याने त्याचे नाव ऋषीकेश प्रभाकर पाटील वय २४ वर्षे, रा. के. के. मार्केट जवळ शंकर महाराज मठ, कात्रज, पुणे. असे असल्याचे सांगीतले असता.सदरचा इसम व सीसीटीव्ही फुटेज मधील इसम तसेच वापरलेली दुचाकी मध्ये तंतोतंत साम्य दिसुन आल्याने, त्याची अंगझडती घेतली असता गुन्हयातील एक मोबाईल मिळून आला. त्यास अटक करून त्याचेकडून त्याचे राहते घरी ठेवलेले गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल, इंजिनिअरींग कॅल्क्युलेटर
व बॅग मिळून आली. गुन्हा करते वेळी वापरलेली मोटारसायकल सह चोरीस गेला एकुण ९६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा उच्च शिक्षीत असून एकाकंपनीमध्ये अॅप्रेंटीस करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे श्री बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
,वानवडी पोलीस स्टेशन श्री. भाऊसाहेब पटारे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार कदम, गोसावी, चोरमले, गायकवाड सुतार, राठोड यांनी केली आहे.