• May 17, 2023
  • No Comment

मध्यरात्रीच्या वेळी कार चालकास लुटणारया टोळीचा पर्दाफाश

मध्यरात्रीच्या वेळी कार चालकास लुटणारया टोळीचा पर्दाफाश

    डी. पी. कलेक्शनच्या समोर, जिजामाता चौकातुन चिंतामणी ज्ञानपीठ या ठिकाणी जाणारे रोडवरती आंबेगाव पठार, पुणे येथे फिर्यादी हे त्यांची चारचाकी पार्क करुन लघुशंका करता थांबले असताना ३ अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादी मारहाण करुन त्यांना शिवीगाळ करुन त्यांचेकडील २५,३००/- रुपयांची एक सोन्याची चेन, मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने चोरी केली आहे. तसेच
    सदर तीन इसमांनी चिंतामणी ज्ञानपीठ समोरुन सहफिर्यादी टँकर चालक यांचा २००० /- रुपये किंमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरी केला आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फेतीने माहीती मिळाली की, दिनांक २८/०४/२०२३ रोजी पहाटेच्या वेळी चिंतामणी ज्ञानपीठ, आंबेगाव पठार, येथे रेकॉर्डवरील आरोपी समीर शेख, सिध्दार्थ गायकवाड व त्याचा एक साथीदार असे तिघांनी मिळुन एका कार चालकास लुटले आहे. त्यानुसार भारती विद्यापीठपोलीसस्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीतांचा घेतला असता वालवेकर लॉन्स,ट्रेजर पॉईंन्टशेजारील नाल्याचे पुलाजवळ आरोपी १. समीर रज्जाक शेख, वय २३ वर्षे, रा. ५४/२ लेन
    नंबर ०२, अण्णाभाऊ साठे नगर, अरण्येश्वर, पुणे २. सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २१ वर्षे, रा. ५४/२लेन नंबर ०२, अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, पुणे हे मिळुन आल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान आरोपींकडे तपास करीत असताना आरोपी सिध्दार्थ विजय गायकवाड, वय २१
    वर्षे, रा. ५४/२ लेन नंबर ०२, अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, पुणे हा तडीपार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेली ३०,००० /- रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.
    सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस
    स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिनय
    चौधरी, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार,धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *