• May 20, 2023
  • No Comment

विवाह समारंभात झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

विवाह समारंभात झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

    पुणे: विवाह समारंभात झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून उपहारगृहाची तोडफोड केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली.
    या प्रकरणी करण जांभळे, गणेश खांडेकर, मोन्या सुर्वे, मयूर परब, अक्षय बारगजे यांच्यासह दोन ते तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दिलीप लोखंडे (वय ३२, रा. कृष्णकुंज, स्वामी नारायण मंदिरामागे, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


    सागर यांचा मित्र ऋषिकेश याच्या विवाह समारंभात आरोपींशी किरकोळ कारणावरुन आरोपी मोन्या सुर्वे याच्याशी वाद झाला होता. त्यानंतर सागर आणि मित्र ऋषीकेश रात्री नऱ्हे परिसरातील व्हीआर कॅफेत जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी मोन्या सुर्वे आणि साथीदार तेथे आले. त्यांनी उपहारगृहात कोयते उगारुन दहशत माजविली. सागर याच्या मनगटावर कोयत्याने वार केला. उपहारगृहातील खुर्च्याची तोडफोड, तसेच दगडफेक करून आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत

    Related post

    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी अटकेत

    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – हडपसर परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी तत्पर तपास करत…
    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी जप्त

    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : हडपसर परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या…
    हडपसरमध्ये मुसळधार पाऊस; झाड कोसळले, नोबल हॉस्पिटल पार्किंगमध्ये पाणी साचले

    हडपसरमध्ये मुसळधार पाऊस; झाड कोसळले, नोबल हॉस्पिटल पार्किंगमध्ये पाणी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहराच्या पूर्व भागातील हडपसर, मांजरी आणि महंमदवाडी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *