• May 20, 2023
  • No Comment

अनैतिक संबंध युवकाने पहिल्याने बदनामी होईल या भीतीने दोघांनी केली तरुणाची हत्या

अनैतिक संबंध युवकाने  पहिल्याने बदनामी होईल या भीतीने दोघांनी केली तरुणाची हत्या

    लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील चिद्रेवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका 32 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंध सुरु असताना या युवकाने पहिल्याने आता आपली बदनामी होईल या भीतीने दोघांनी तरुणाचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारुन हत्या केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. तर याप्रकरणी वाढवणा पोलिसांत दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली आहे. तर गणेश गोपीनाथ वस्तुरगे (वय 32 व्र्ह्से, रा. चिद्रेवाडी, ता. चाकूर) असे मयत युवकाचे नाव असून, प्रदीप शंकर करडखेले (रा. खरबवाडी, ता. अहमदपूर) याच्यासह एक महिला आरोपी आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील खरबवाडी येथील प्रदीप करडखेले आणि उदगीर तालुक्यातील एका गावातील महिलेचे गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. तर रात्रीच्या सुमारास त्यांच्यात सुरु असलेले अनैतिक संबंध गणेश वस्तुरगे याने पाहिले होते. त्यामुळे गणेश आपल्या अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल अशी भीती प्रदीप करडखेले आणि संबंधित महिलेमध्ये निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोघांनी गणेश वस्तुरगे यांचा गळा आवळून आणि डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून त्याची हत्या केली. गणेशला संपवल्यावर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत नेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

    खाक्या दाखवताच खुनाची कबुली

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तापसाची सूत्र फिरवली आणि प्रदीप करडखेलेसह एका महिलेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. तर गणेशचा मोबाईल फेकून अथवा लपवून ठेवला असावा, अशा आशयाची फिर्याद गणेशच्या आई शिवगंगाबाई गोपीनाथ वस्तूरगे (रा. चिद्रेवाडी) यांनी दिली आहे. त्यानुसार वाढवणा पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना गुरुवारी चाकूरच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *