• May 20, 2023
  • No Comment

चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

चालत्या कारमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

    आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर चार तरुणांनी चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे.एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग ३१सीवर चार तरुणांनी मुलीला जबरदस्तीने कारमध्ये नेत चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, हा भाग डोटमा शहराजवळ आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू करून बुधवारी सायंकाळी चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना कोक्राझार येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *