- May 23, 2023
- No Comment
पुण्यातील उंड्री चौकात विचित्र अपघात, ट्रॅव्हल्स बसची 5 ते 6 गाड्यांना धडक
पुणे : बसचा ब्रेक फेल झाल्याने शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे शहरात एन आय बी एम उंड्री रोडवर हा अपघात झाला आहे. एन आय बी एम उंड्री रोडवर उताराला एका बसचा ब्रेक फेल झाला. या बसने दुचाकी, रिक्षा आणि बीएमडब्ल्यू कारसह अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.
कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोड परिसरात हा अपघात झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या वाहनांना धडक दिली आहे. अपघातात एक रिक्षा, टेम्पो, दोन कार, एक दुचाकी, एक चारचाकी या वाहनांना बसने धडक दिली. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा वर्दळीचा भाग आहे. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.