• May 23, 2023
  • No Comment

पोलीसांकडून वाहन चोरां विरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयांकडुन १० दुचाकी वाहने हस्तगत

पोलीसांकडून वाहन चोरां विरोधात धडाकेबाज कारवाई वाहन चोरटयांकडुन १० दुचाकी वाहने हस्तगत

तपास अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडर बायपासजवळ दुचाकीवरून जाणारे दोन अनोळखी इसमांना थांबविणेचा इशारा केला असता, त्यांनी त्यांची वाहने भरधाव वेगात पळुन जात असताना, त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून १ दिनेश रघुनाथ शिंदे, वय२८वर्षे,रा.मातंग वस्ती,वैदयुवाडी, हडपसर, पुणे २. आकाश तुळशीराम ननवरे, वय २५ वर्षे, रा. गोसावी वस्ती,हडपसर, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.

वर नमूद अनोळखी इसम व त्यांचे ताब्यातील वाहनाबाबत पोलीस ठाणे गुन्हे अभिलेखांची पाहणी करूनसदरील अनोळखी इसम यांना अटक करून त्यांचेकडे अधिक तपास केला असता, पुणे शहरात वेगवेगळया परिसरात वाहन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील आरोपी यांचेकडे तपासादरम्यान खालील पोलीस स्टेशनकडील
गुन्हे उघडकीस आले असून, एकुण ०८ मोटारसायकल असा एकुण ३,६५,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पुढीलप्रमाणे एकुण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्हयातील आरोपीस गुन्हयाचे ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपीने गुन्हयात चोरलेली यामाहा दुचाकी व गुन्हा करतेवेळी वापरलेली पल्सर ताब्यात घेण्यात आले असून, सदर संबधाने आरोपीत यांचा २४ तासाच्या आत शोध घेवून, बरकत अब्दुल शेख, वय ४५ वर्षे, रा. जैन टाऊनशिप, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे यास अटक करणेत आलेले आहे. सदर आरोपीत यांचेकडील
वानवडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. नंबर २२८ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा उघडकीस आणुन, यामहा कंपनीची एक दुचाकी तसेच पल्सर गाडी जप्त करणेत आलेली आहे.
सदर गुन्हयात ०२ दुचाकी जप्त करून एकुण रू.१,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून, २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *