- June 1, 2023
- No Comment
मुंबईतील मॉडेलवर रांचीत बलात्कार, मग धर्मांतरासाठी दबाव पीडितेची थेट पोलीस ठाण्यात धाव
बिहारच्या भागलपूर येथे राहणारी मानवी राज सिंह नाव सध्या चर्चेत आहे. मानवीनं एका मॉडेलिंग एजेन्सीच्या मालकावर लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकणे, मारहाण करणे, अश्लिल फोटो शेअर करत जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप लावले आहेत. एजेन्सीच्या मालकाने सुरुवातीला त्याचे नाव यश म्हणून सांगितले परंतु त्यानंतर त्याचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे मानवीला कळाले.
मानवीचा आरोप आहे की, तनवीरविरोधात आधीही पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यावेळी तनवीरने एक प्रतिज्ञापत्र सादर करत यापुढे तो मला त्रास देणार नाही असं सांगितले. परंतु त्यानंतर पुन्हा तो मला छळायला लागला. मी मुंबईला आली तेव्हा माझ्या मागे तोही आला. मला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मी वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून मला आणि माझ्या कुटुंबाला तनवीरपासून जीवाचा धोका आहे असं तिने सांगितले.
मानवी राजच्या शिक्षणाची सुरुवात ही डॉन बॉस्को स्कूलमधून झाली. सध्या ती बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मानवीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी तिने झारखंड रांची येथील यश मॉडेल एजन्सीशी संपर्क साधला. याठिकाणी मॉडेलिंगबाबत ज्ञान दिले जाते. त्यावेळी तिची ओळख एजन्सी मालक तनवीर अख्तर खानसोबत झाली. तनवीरने मानवीला स्वत:चे नाव यश असल्याचे सांगितले. हळूहळू या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
त्यानंतर तनवीरनं मानवीला लग्नासाठी प्रपोज केले. तेव्हा मानवीला यशचे खरे नाव तनवीर अख्तर खान असल्याचे कळाले. ही माहिती मिळताच मानवीने तनवीरसोबत बोलणे सोडले. मात्र तनवीरने तिचा पाठलाग सोडला नाही. मानवीवर लग्नासाठी आणि धर्म परिवर्तनासाठी सातत्याने दबाव टाकत होता. तनवीर मानवीला ब्लॅकमेलिंग करू लागला. मानवीचे अनेक अश्लिल फोटो त्याच्याजवळ होते. तनवीरपासून सुटका व्हावी यासाठी मानवीने रांचीहून मुंबई गाठली.
सध्या या प्रकरणी पोलीस गुन्हा नोंद झाला असून मानवीने ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ जारी करत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईहून ही केस रांचीला ट्रान्सफर करण्यात आली आहे. मात्र तनवीरने मानवीचे आरोप फेटाळत म्हणाला की, मानवी माझ्याकडे काम करायची. तिच्यामुळे मला बिझनेसमध्ये नुकसान झाले. त्यासाठी मी तिला भरपाई मागितली. तेव्हापासून ती मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी ब्लॅकमेल करत आहे. मानवीचा बॉयफ्रेंड रवजोत सिंह आणि त्याच्या मित्राने मोबाईल डेटा चोरी करत मला ब्लॅकमेल केले असा दावा केला आहे.