- June 1, 2023
- No Comment
शिरुर शहरात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार
शिरुर शहरात एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचे संतापजनक घटना घडली आहे. सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात बेड्या ठोकत अटक केली. पाचू हादरा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शिरुर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. दरम्यान, पाचू हादरा याने या चिमुरडीला बाजूच्या खोलीत घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी या चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई शेजारील घराकडे पळत गेली असता तिला आपल्या बालिकेवर पाचू हादरा अत्याचार करत असल्याने दिसले.
चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन करा, वासनांध आणि विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय निंदनीय आहे. हे अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शासन करा, अशी मागणी कुटुंबीय आणि महिला संघटनांकडून होत आहे. यावेळी बालिकेच्या आईने आरडओरडा केल्याने आरोपी पाचू पळून गेला.
याबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी आरोपी परप्रांतिय असल्याने पळून जाऊ शकतो म्हणून तातडीने पोलिसांचे दोन पथक नेमून अहमदनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. मात्र सदर ठिकाणी आरोपी आला नाही.
त्यानंतर सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, संपत खबाले, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, नितेश थोरात यांनी शिरुर शहरात शोध मोहीम राबवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचू हादरा (रा. शिरूर ता. शिरुर जि. पुणे) याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील करत आहेत