- June 1, 2023
- No Comment
रिसॉर्टवर अश्लील डान्सचा अश्लाघ्य प्रकार याप्रकरणी १२ पुरुष आणि ६ तरुणी अशा एकूण १८ जन ताब्यात
उमरेड-कऱ्हाडला- पवनी अभयारण्या शेजारी असलेल्या रिसॉर्टवर अश्लील डान्सचा अश्लाघ्य प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उजेडात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नागपूर पथकाने ही कारवाई करताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी १२ पुरुष आणि ६ तरुणी अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उमरेड तालुक्यातील तिरखुरा शिवारात असलेल्या रिसॉर्टवर हा अश्लील नाचगाण्याचा धिंगाणा सुरू होता.
टायगर पॅराडाईज असे या रिसॉर्टचे नाव आहे. रिसॉर्टच्या एका शाही हॉलमध्ये अश्लील डान्स सुरू होता. दुसरीकडे या डान्सवर हवेत पैसे फेकल्या जात होते. वृत्त लिहिस्तोवर मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत एलसीबीची कारवाई सुरू होती. या कारवाईत नागपूर शहर आणि मौदा तालुक्यातील डॉक्टर, बडे व्यापारी आदींचा समावेश आहे.