- June 1, 2023
- No Comment
बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केली. ; बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला
नागपूर : बहिणीशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने वस्तीतील व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केली. वस्तीत बदनामी झाल्यामुळे युवतीच्या भावाने तिच्या प्रियकराचा लाकडी दांडा आणि दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी गिट्टीखदानमध्ये घडली. कपील डोंगरे (३७, गंगानगर, गिट्टीखदान) असे मृत युवकाचे नाव आहे.
कपील डोंगरे हा अविवाहित असताना त्याचे वस्तीतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. यादरम्यान त्या युवतीचे रायपूरच्या युवकाशी लग्न झाले. तर कपिलनेही बालाघाटमधील युवतीशी लग्न केले. दोघांचाही सुखी संसार सुरु होता. कपीलने गिट्टीखदानमध्ये मोठे मोबाईल विक्रीचे दुकान टाकले. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील हा रायपूरला गेला. तेव्हा त्याने विवाहित प्रेयसीला फोन केला. तिला भेटायला एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान कपीलने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली. गेल्या काही दिवसांपूर्वी कपील आणि त्या युवतीचा एक फोटो त्याच्या पत्नीला दिसला. त्यावरून पती-पत्नीत वाद होत होता. पत्नीने त्या युवतीला फोन करून रागवले. तर कपीलच्याही कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत सांगून गोंधळ घातला. काही नातेवाईकांनी तिची समजूत घालून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती मानायला तयार नव्हती. तिने पतीच्या मोबाईलमधून प्रेयसीसोबतचे काही अश्लील छायाचित्र आणि चित्रफीती काढल्या आणि थेट वस्तीतील एका व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केल्या. त्यामुळे त्या युवतीची वस्तीत बदनामी झाली.