- June 28, 2023
- No Comment
कदमवाकवस्ती येथील लावणी कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद
लोणी काळभोर : लोकमत सखी मंचच्या वतीने कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथे सखींसाठी आयोजित खास लावणीच्या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी नृत्यांगनांनी मराठी लावण्यांवर केलेल्या धडाकेबाज ग्रामीण नृत्यामुळे सखी मंच सदस्यांची पावले थिरकली. चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या भागातील स्त्रियांनी या कार्यक्रमात नृत्य करून भरपूर आनंद घेतला. कदमवाकवस्ती येथील मधुबन लॉन्स या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लावणी महोत्सवाचे उद्घाटन लोणी काळभोर सखी मंच संयोजिका रेश्मा नामुगडे, सोनमvनामुगडे, नीलम खेडेकर, रूपाली क्षीरसागर, प्रियंका कुतवळ, पल्लवी कोन्हाळकर, रूपाली शेडगे यांच्या हस्ते लोकमत समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले
यानंतर कार्यक्रमासउपस्थित पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा भारती शेवाळे, कदमवाकवस्तीच्या माजी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच राजश्री काळभोर, ग्रामपंचायत सदस्या रूपाली काळभोर, मंदाकिनी नामुगडे,समितालोंढे,लोणीकाळभोरच्या माजी सरपंच वंदना काळभोर,अश्विनी गायकवाड यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून सखीमंच सदस्यांचा उत्साह वाढविला. लोकमत सखी मंच उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकमत सखी मंचच्या ‘लावण्यसंध्या’ या कार्यक्रमासाठी कृष्णाई उद्योग समूह व हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर आणि किशोर टिळेकर यांचे सहकार्य लाभले. ‘लोकमत सखी मंचा’च्या वतीने आभार मानण्यात आले.