• June 30, 2023
  • No Comment

मावळात देशी बनावटीच्या पिस्टलसह तरुणाला अटक

मावळात देशी बनावटीच्या पिस्टलसह तरुणाला अटक

    पिंपरी-चिंचवड: दोन दिवसांपुर्वीच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार पिस्टल 14 जिवंत काडतुसासह दोघांना अटक करत एक मोठा कट उधळून लावला. त्याच्या दोन दिवस आधी गुन्हे शाखा पाचच्या पथकाने ही मावळातूनच आणखी एकाला देशी बनावटीचे पिस्टल एक जिवंत काडतुस यासह अटक केली आहे. हि कारवाई सुदवाडी फाटा जांबवडे येथे 24 जून रोजी दुपारी करण्यात आली .

    मयुर अशोक पवार (वय 29 रा.वराळे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बुधवारी (दि.28) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी अटक केली असता त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्टल व 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आर्म अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलीस याचा पुढील तपास करत आहेत. मात्र बेकायदेशीररित्या वाढत जाणाऱ्या या शस्त्रांची संख्या पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *