• July 1, 2023
  • No Comment

2 वर्षांपूर्वी केलेल व्हिडीओ कॅालवर पुण्यात इंजिनियरींग कॅालेजच्या शिक्षिकेला ब्लॅकमेल

2 वर्षांपूर्वी केलेल व्हिडीओ  कॅालवर पुण्यात इंजिनियरींग कॅालेजच्या शिक्षिकेला ब्लॅकमेल

    पुणे : पुण्यात इंजिनियरींग कॅालेजच्या शिक्षिकेला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. मात्र, हा विद्यार्थी पश्चिम बंगालमध्ये बसून महिला शिक्षिकेला 5 हजार अमेरिकन डॅालर मागून ब्लॅकमेल करत होता.
    हडपसरमधल्या इंजिनियरिंग कॅालेजच्या शिक्षिकेला विद्यार्थ्यांसोबत ठेवलेली मोकळी वागणूक भलतीच महाग पडली. मयांक सिंग नावाच्या विद्यार्थ्यासोबत व्हिडीओ कॅालवर 2 वर्षांपूर्वी केलेल संभाषण व्हायरल करण्याची धमकी देत 5 हजार अमेरिकन डॅालरची मागणी करण्यात आली. या शिक्षिकेच्या पतीला हा व्हिडीओ पाठवूनही पैशानी मागणी करण्यात आल्याने शिक्षिकेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे

    मयांक सिंग हा विद्यार्थी 2 वर्षांपूर्वी हडपसर येथे इंजिनियरिंग कॅालेजला शिकायला होता. त्यावेळी फिर्यादी शिक्षिका या आरोपीला शिकवायला होत्या. वेगवेगळ्या कारणाने आरोपी या शिक्षिकेला व्हिडीओ कॅाल करत होता. दोन वर्षांपूर्वी तो गावी निघून गेला होता. अचानक 2 वर्षांनी त्याने शिक्षिकेला आणि तिच्या पतीला फोन करुन न्यूड व्हिडीओ पाठवून धमकावायला लागला होता. त्याने 5 हजार अमेरिकन डॅालरची मागणी केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या एका व्हिडीओ कॅालच्या धमकीने शिक्षिकेच कुटुंब उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमधून बोध घेण्याची आवश्यकता आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *