• July 1, 2023
  • No Comment

खळबळजनक घटना जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार

खळबळजनक घटना जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार

    पुणे  : पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात जिल्ह्यातील एका शाळेत 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचं सांगण्यात येत आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

    मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर बुधवारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर दाखल केलेल्या पुणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.


    आता या 12 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आलं आहे. हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना समुपदेशनाचा आधार दिला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी 12 वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *