- July 1, 2023
- No Comment
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, सहा महिन्यांची गरोदर राहिल्याचं समजताच आई-वडिलांसह केलं गायब
बीड: अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर सतत पाच ते सहा जणांनी अत्याचार केला. या अत्याचारामध्ये पीडिता साडेसहा महिन्याची गरोदर राहिली. मात्र, हा गर्भपात करण्यासाठी या मुलीच्या घरच्यांना धमक्या देऊन जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गर्भपात करत नसल्याने मुलीच्या आई-वडिलांसह मुलीला या नराधमांनी गायब केलं. मुलीच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाकडे न्याय मागण्यासाठी तक्रार दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे
बीडमधील काही अंतरावर असलेलं खापर पांगरी गाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सतत लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामधून पीडिता साडेसहा महिन्यांची गर्भवती राहिली. मात्र, या नराधमांना हे लक्षात येतात पीडितेच्या घरच्यांना जोर जबरदस्ती धमकवण्याचा आणि गर्भपात करण्याच सांगत राहिले. मात्र, यामध्ये गर्भपात नाही केला. तर तुम्हाला आणि मुलीला मारून टाकण्याची धमकी देखील या नाराधामांनी दिली. मात्र, तरी देखील गर्भपात न केल्याने या नराधमांनी पीडितेला आणि आई-वडिलांना एका अज्ञात स्थळी नेऊन ठेवल्या असल्याची तक्रार मुलीच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाकडे दिली आहे. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
यामध्ये चुलत भावाने दिलेल्या पत्रात पीडितेवर अत्याचार करून तिचा गर्भपात करण्याचं त्यांना जमाने ठरवला आहे आणि यासाठीच आई-वडिलांसह पीडितेला आज्ञास्थळी नेऊन ठेवलं असल्याची तक्रार चुलत भावाने दिली आहे. यामध्ये जर पीडितेच्या गर्भपात केला तर तिच्या जीवाशी खेळ केल्यासारखं होईल यात तिचा जीवही जाऊ शकतो. यासाठी या नराधमांचा शोध घेऊन अल्पवयीनची सुटका करावी आणि या नराधमांना बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करत कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मुलीच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये थेट राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे गेलेल्या पत्रामुळे जिल्ह्यात आता या प्रकरणात पुढे काय घडणार नराधमांना शिक्षा होणार की नाही आणि पोलीस प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन त्या नराधमाला कठोर शिक्षा करणार का हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे