• July 3, 2023
  • No Comment

कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडतातः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडतातः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली.

    त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडत असतात.’

    अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

    शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्याच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो. कर्तुत्ववान कार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जातं तेंव्हा अशा घटना घडत असतात. डबल इंजिनच्या सरकारला तिसरे इंजिन जोडले आहे. यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *