- July 3, 2023
- No Comment
या गोष्टी घडणारच होत्या: संजय राउत
शिंदे सरकार लवकराच पडणार आहे. त्यासाठी त्यांनी अजित पवारांचा हा टेकू घेतला आहे. हा भूकंप राजकीय नाही. या गोष्टी घडणारच होत्या.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राउत म्हणाले, ‘शिंदे सरकार पडणार आहे. लवकरच शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील. डबल इंजिन असलेल्या सरकारचे एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हणून दुसरे इंजिन लावले आहे. शिंदे फार काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत. पुढील काही दिवसात महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल. आम्ही पुन्हा उभे राहू.
आता राज्यात जे झाले या सर्व प्रकाराला लोकांचा अजिबात पाठींबा नाही. जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी बाबत घडले त्याला जनतेचा अजिबात पाठींबा नाह, असेही ते म्हणाले.
संजय राउत यांनी याबाबत एक ट्विट देखील केले. त्यात ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले ‘मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू’ होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”